मुंबई, दि. ४ (पीसीबी) – सध्या एका महिला कंडक्टरला कामावरून निलंबित करण्यात आल्याची घटना घडली समोर आली आहे. ऑन ड्युटी रील्स बनवल्याने या महिला कंडक्टरला कामावरून काढून टाकल्याचं समोर आलं आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचं सांगत महामंडळाने या महिला कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे.आता यावर जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया देत निलंबनाची कारवाई मागे घ्या अशी मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. सोशल मीडियावर रिल आणि व्हिडीओ बनवून अपलोड केल्याने महिला कंडक्टरचं निलंबन करण्यात आलं होतं. एसटीची प्रतिमा मलीन होत असल्याचं कारण देत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान काल यावर प्रतिक्रिया देताना या महिला कर्मचाऱ्याने ही कारवाई एसटी संपाच्या मोर्च्यात सहभागी झाली नाही म्हणून माझ्यावर राग काढत मला अधिकाऱ्यांनी निलंबित केले असल्याचा आरोपही तिने केला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये ही महिला कर्मचारी कार्यरत होती. प्रतिक्रिया देताना तिने स्टाफवर आरोपही केले आहेत. अनेक बस कर्मचारी ऑन ड्युटी डेपोच्या आवारात व्हिडिओ बनवतात तरी माझ्यावरच कारवाई का? असा प्रश्न तिने माध्यामांमार्फत उपस्थित केलाय.
या सगळ्या प्रकरणामुळे फेमस रील स्टार कंडक्टर महिलेचे फॉलोवर्सही कमी झाले असल्याचे तिने सांगितले. अनेक कर्मचारी माझा तिरस्कार करतात. त्यामुळे मी व्हिडिओ बनवताच मला निलंबित करण्यात आलं मात्र अनेक कर्मचारी कित्येकदा ऑन ड्युटी डेपोच्या आवारात व्हिडिओ बनवत असतात मात्र त्यांच्यावर कधी कारवाई करण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.










































