बी यु भंडारी शोरूममध्ये दोन लाखांची चोरी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

वाकड, दि. १५ (पीसीबी) – बी यु भंडारी या वाहनांच्या शोरूम मधील कॅशियरच्या खोलीतून चोरट्यांनी दोन लाख १५ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. १३) सकाळी बी यु भंडारी ऑटो प्रा ली या शोरूम मध्ये वाकड येथे उघडकीस आली.

राहुल दत्तात्रय खांदवे (वय ४७, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील बी यु भंडारी ऑटो प्रा ली या शोरूम मध्ये शनिवारी (दि. १०) रात्री साडेसात ते मंगळवारी (दि. १३) सकाळी साडेनऊ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कॅश विभागातून दोन लाख १५ हजार पाच रुपये रोख रक्कम आणि हिशोबाचे व्हाउचर चोरून पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article