गुजराथ दंगल प्रकऱणी तीस्ता सेटलवाड यांना जामीन

1 Min Read

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) : गुजरात दंगलीनंतर सरकारविरोधात कट रचल्याच्या आरोपांखाली सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून त्या अटकेत आहे. त्यात आता सर्वोच्च न्यायालयाने तीस्ता सेटलवाड यांना मोठा दिलासा दिला आहे. तीस्ता सेटलवाड यांना अंतरित जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यू. यू. ललित, न्यायामूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू भट यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. गुजरात दंगलप्रकरणी खोटी कागदपत्रे तयार करुन अनेकांना त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सेटलवाड यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणी २५ जूनपासून सेटलवाड अटकेत होत्या. त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने ३ ऑगस्टला असलेलली सुनावणी सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलली होती. त्याविरोधात सेटलवाड यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे.

Share This Article