सोशल मीडियावर मेसेज करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

1 Min Read

पिंपरी दि. १ (पीसीबी) -अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून इंस्टाग्रामवर मेसेज करत तिचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि.30) विकासनगर, किवळे येथे घडली.

याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनू (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 13 वर्षाच्या पुतणीचा आरोपीने शाळेत व घरी जाताना पाठलाग केला. मंगळवारी त्याने पिडीतेच्या आजीच्या फोनवर इंस्टाग्राम अकाऊंटवरून बळजबरी मॅसेज करून त्रास दिला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article