पार्किंगमधून अडीच लाखांचे पार्ट चोरीला

1 Min Read

पिंपरी दि. १ (पीसीबी) -पिंपरीगावातील एका चित्रपट गृहाजवळील पार्किंग मध्ये उघड्यावर ठेवलेले पार्ट चोरीला गेले. ही घटना 22 ते 28 ऑगस्ट या कालावधीत घडली.

रितेश सतीश सोनकर (वय 21, रा. पिंपरी, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर इम्प्रा अँड सिव्हिल इंजिनिअर प्रा ली या कंपनीचे दीड लाख रुपयांचे एच डी डी मशीनचे दोन पार्ट आणि 11 हजारांचा एक पार्ट असे दोन लाख 60 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article