प्रभाग रचनेचे नवीन सरकारचे विधेयक मंजूर..

0
168

 मुंबई, दि. २४ (पीसीबी) : महाविकास आघाडीने निवडणुकांसाठी एक वॉर्ड, एक सदस्य प्रभाग पद्धतीचा कायदा मंजूर करून घेतला होता. मात्र, आता दोन वर्षांनंतर ‘एक वॉर्ड, एक सदस्य प्रभाग पद्धतीवरून यू टर्न घेत राज्यातील प्रमुख 15 महापालिकांच्या तोंडावर पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. प्रभाग रचनेचे नवीन सरकारचे विधेयक आज मंजूर झाल्यानंतर चार सदस्यीय प्रभाग पद्धत अंमलात येणे निश्चित झाले आहे. दरम्यान, याच मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ चा आदेश सोमवारी (दि.२२) दिलेला असताना विधानसभेत चार सदस्यांचा प्रभाग करायचे विधेयक मंजूर करण्यात आले.

महानगरपालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तयार केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची या प्रस्तावाला संमती असून, काँग्रेसमध्ये संभ्रम आहे. या प्रस्तावाला संमती मिळावी, यासाठी काँग्रेसची चर्चा करण्यात येत असून, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काँग्रेस मंत्र्यांशी मंगळवारी चर्चा केली.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धत, तर महानगरपालिकांत 4 नगरसेवकांचा एक प्रभाग पद्धतीच्या रचनेचा प्रस्ताव तयार आहे. या प्रस्तावावर बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता होती. महापालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेबाबत महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या नेत्यांची सोमवारी बैठक झाली. महापालिकांच्या प्रभागांची रचना आणि आरक्षण यावर या बैठकीत चर्चा झाली. मात्र, कोणताही अंतिम निर्णय झाला नव्हता.

महापालिका निवडणुकांचं गणित वेळेनुसार बदलत गेले. पक्षांचे अर्थकारण आणि राजकारणानुसार, या निवडणुकांचे महत्त्व हळूहळू वाढत गेले आणि त्यासाठी अलीकडच्या काळात बहुसदस्यीय पद्धतीतही सतत बदल होतात. मागच्या अडीच वर्षांत तब्बल चार वेळा महापालिका प्रभाग पद्धती बदलली.

डिसेंबर 2019 रोजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच बंद करण्यात आली.
मार्च 2020 मध्ये एकसदस्यीय वॉर्ड पद्धत पुन्हा लागू आणि नगराध्यक्षांची निवडणूक नगरसेवकांमधून लागू करण्यात आली.
ऑक्टोबर 2021 मध्ये महाविकास आघाडीने पुन्हा निर्णय बदलला. बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आली. आणि एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडीची पद्धत लागू केली.
3 ऑगस्ट 2022 रोजी नव्या सरकारने ही पद्धत बदलून बहुसदस्यीय पद्धत पण 2017 च्या निर्णयाप्रमाणे म्हणजेच एका प्रभागात तीन नाही तर चार नगरसेवक निवडीची पद्धत लागू केली.