प्रेयसीवर प्रेम करू नको म्हणत तरुणावर चाकूने वार

0
303

पिंपरी दि. २४ (पीसीबी) -तरुणाच्या प्रेयसीवर एक तरुण प्रेम करत असल्याने प्रियकराने त्या तरुणावर चाकूने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 22) सकाळी खेड तालुक्यातील भांबोली येथे घडली.

दीपक लक्ष्मण बांदल (वय 21, रा. भांबोली, ता. खेड. मूळ रा. अहमदनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश नवनाथ घुले (वय 25, रा. मेदनकरवाडी, ता. खेड. मूळ रा. औरंगाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक हे भांबोली येथील एका कंपनीत वाहन चालक म्हणून काम करतात. ते सोमवारी सकाळी आठ वाजता भांबोली गावातील एका हॉटेलसमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी योगेश तिथे आला. तू माझ्या प्रेयसीवर प्रेम करू नको. तिचा नाद सोडून दे. ती माझी प्रेयसी आहे, अशी धमकी देऊन योगेशने दीपक यांच्या हातावर, पायावर आणि पोटावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. यात दीपक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी योगेश याला अटक केली आहे. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.