वेश्या व्यवसाय प्रकरणी तरुणास अटक

0
820

आळंदी, दि. १९ (पीसीबी) – वेश्या व्यवसाय प्रकरणी आळंदी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 17) सायंकाळी चाकण-आळंदी रोड, आळंदी येथे करण्यात आली.

ओंकार दत्तू चेवले (वय 22, रा. धनेगाव, पो. सोनवती, ता. जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी महिलेनं पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला. त्यातून मिळालेल्या पैशांवर आरोपीने त्याची उपजीविका भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आळंदी पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 24 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.