पिंपरीत दीड कोटी खर्च करून उद्यान विकसित करणार

0
380

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी येथील महापालिकेच्या आरक्षित जागेत नवीन उद्यान विकसित करण्यात येणार असून त्यासाठी 1 कोटी 62 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी उद्याने विकसित करण्यात येत आहेत. उद्यान विभागामार्फत शहरात 181.95 हेक्टर क्षेत्रात एकूण 188 उद्याने विकसित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी येथील प्रभाग क्रमांक 21 मध्ये महापालिकेच्या आरक्षित जागेत नवीन उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर 2 कोटी 27 लाख 55 हजार रूपये अपेक्षित धरण्यात आला.

त्यामध्ये रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 2 कोटी 25 लाख 83 हजार रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, नऊ ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी शिवम एंटरप्रायजेस या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 29.99 टक्के कमी म्हणजेच 1 कोटी 58 लाख रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 3 लाख 6 हजार आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 1 लाख 71 हजार रूपये असे एकूण 1 कोटी 62 लाख 88 हजार रूपये खर्च होणार आहेत. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.