भाजप नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या विशेष सरकारी वकिलाला खटल्यातून हटवले

0
347

पुणे, दि. २६ (पीसीबी) ; देवेंद्र फडणवीस,गिरीष महाजन यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना खोटय़ा प्रकरणात अडकवण्याचा आरोप असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण याला राज्य सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांच्याविरोधातील खटल्यातून हटवले आहे. त्यांच्या जागी या खटल्यात अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रविण चव्हाण यांची राज्यातील अनेक महत्त्वाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून आघाडी सरकार काळात झाली होती नेमणूक .जळगाव मधील एका दाखल गुन्हा पुण्यात वर्ग करुन त्यामध्ये गिरीष महाजन यांना मोक्का लावण्याचा कट केल्याचा चव्हाण यांच्यावर आहे आरोप.चव्हाण यांच्याकडे डीएसके, रवी बर्हाटे, शिक्षक भरती घोटाळा असे खटले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात पेन ड्राईव बाम्ब ने चव्हाणचा पर्दाफाश केला होता.