फडणवीसांना पत्नीकडून वाढदिवसाच्या अशाही शुभेच्छा !

0
266

नागपूर, दि. २२ (पीसीबी) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्नी अमृता फडणवीस यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. ”जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते, असं अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत, पती देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ”जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करत त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस २०१४ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर अमृता फडणवीसही कायम चर्चेत असतात. त्यांची गाणी असेल किंवा त्यांनी केलेली राजकीय टीका-टीपणी असेल अमृता फडणवीस नेहमीच बातम्यांमध्ये असतात. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवरून अनेकदा वाद झाले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर सत्ता स्थापनेच्या काळात अमृता फडणवीस विरुद्ध ठाकरे कुटुंब असा शाब्दिक सामना महाराष्ट्राने पाहिला आहे. यासोबत त्या सोशल नेटवर्किंगवर साईटवरही सक्रिया असतात.