ईडी कार्यालया समोर काँग्रेसचे आंदोलन

0
210

– मल्लिकार्जून खरगें, भाई जगताप यांच्यासह ७५ खासदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : नॅशनल हेराल्ड प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) आज (२१ जुलै) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी होत आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभरात विविध ठिकाणी आंदोलनं केली आहेत. काँग्रेसने मुंबईत ईडी कार्यालयासमोरही आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार भाई जगताप यांना ताब्यात घेतले.

सोनिया गांधींवरील ईडी कारवाईविरोधात तेलंगणातही काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर, हातात झेंडे, पोस्ट घेत मोदी सरकारचा निषेध, ईडी सोनिया गांधींना लक्ष्य करत असल्याचाही आरोपऔरंगाबादमध्येही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलन, मोदी सरकारवर दडपशाहीचा आरोप करत कार्यकर्ते रस्त्यावर, घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेधसोनिया गांधींवरील ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचं नाशिकमध्ये आंदोलन, आमदार बाळासाहेब थोरातांसह अनेक काँग्रेस नेते उपस्थित, केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांची मुस्कटदाबी केल्याचा मोदी सरकारवर आरोप.