जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या, महापालिकेचे आवाहन

1 Min Read

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पावसाळ्यामध्ये नागरिकांनी महापालिकेच्या नळावाटे होणा-या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोअरवेल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करु नये.पाणी उकळून घेऊन प्यावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले.ś

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊन साथ पसरु नये यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शिळे किंवा उघड्यावरचे माशा बसलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत, अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे. घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. उलट्या-जुलाब, ताप आजर झाल्यास वेळीच महापालिकेच्या दवाखाने, रुग्णालयात उपचार घ्यावेत.

सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे उपचारास आलेल्या कॉलरा, टायफाईड, गॅस्ट्रो, डिसेंट्री, कावीळ रुग्णांची माहिती महापालिकेच्या जवळच्या रुग्णालयास कळवावी. बांधकाम व्यावसायिकांनी लेबर कॅम्पच्या ठिकाणी महापालिकेच्या नळावाटे पुरविलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. जलजन्य आजार होऊ नयेत याबाबत सर्व कामगारांना सूचना देऊन दक्षता घ्यावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Share This Article