प्रसाद लाड यांच्या घराबाहेरील बॅगेत मोठे घबाड

PCB Admin
1 Min Read

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या निवास्थानाबाहेर रविवारी पहाटे चोरीच्या सामानाची बॅग सापडली. या बॅगेत चलनी नाणी, दागिने आणि देवांच्या मूर्ती आहेत. अनोळखी व्यक्तीने रविवारी पहाटे घराबाहेर बॅग ठेवली होती. दरम्यान, हे साहित्य चोरीचे असल्याचा पोलिसांना संशय असून त्याबाबत माटुंगा पोलीस अधिक तपास करत आहेत.

पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास सुरक्षा रक्षकांनी लाड यांना दूरध्वनी करून निवासस्थानासमोर एक बॅग पडली असल्याची माहिती दिली. त्या बॅगेत तीन वेगवेगळ्या बॅग होत्या. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचून बॅगेची पाहणी केली. सोने, चांदी, पैसे, मूर्ती असा ऐवज बॅगेत होता.

माझ्या घराबाहेर २४ तास पोलिस संरक्षण असते. पोलिसांना संशयित व्यक्ती दिसली होती. पोलिसांनी हटकले असता त्याने बॅग टाकून पळ काढला, अशी माहिती लाड यांनी दिली. दरम्यान, बॅगेतील ऐवज हा प्रसाद लाड राहत असलेल्या इमारतीच्या बाजूच्या इमारतीतील घरातून चोरी झालेला ऐवज असावा असा पोलिसांना संशय आहे. देवघरातील साहित्य चोरण्यात आले आल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांकडे यापूर्वीच एक तक्रार दाखल झाली असून गुन्हा दाखल करून तपासाला सुरू आहे.

Share This Article