तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून दुचाकी पळवली

0
263

चाकण, दि. ८ (पीसीबी) – तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवली. ही घटना गुरुवारी (दि. 7) रात्री साडेबारा वाजता मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे घडली.

अविनाश परशुराम सावंत (वय 29, रा. दारुंब्रे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना नारायणपूर येथे देवदर्शनासाठी जायचे असल्याने ते कपडे बदलण्यासाठी दुचाकीवरून घरी जात होते. दारुंब्रे येथील पाण्याच्या टाकीजवळ आल्यानंतर तिघेजण अचानक त्यांच्या दुचाकीसमोर आले. त्यामुळे अविनाश यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते खाली पडले. त्यानंतर आरोपींनी अविनाश यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांची 20 हजारांची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली.