अजित पवार की जयंत पाटील विरोधी बाकासाठी कोणाची लागणार वर्णी?

0
363

मुंबई ,दि.३०(पीसीबी) – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे मागच्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर पडदा पडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत असलेले एकनाथ शिंदे सत्ता स्थापनेची तयारी करत आहेत. दरम्यान दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांसाठी आज एनसीपीची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार किंवा जयंत पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसपेक्षा जास्त आमदार असल्याने एनसीपीला विरोधी पक्षनेते पद मिळणार असल्याचे चर्चा आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापनेच्या तयारीला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेल्या आमदारांना घेऊन देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन करणार आहेत. शिंदे यांच्यासह आमदार आज मुंबई येथे दाखल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे रात्रीच गोव्यात दाखल झाले होते.आपल्या बंडखोर आमदारांसह शिंदे ताज हॉटेलवर मुक्कामी आहेत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे गट आता मवाळ झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची ताज रेसिडेंसी हॅाटेलमथ्ये बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील राजकीय रणनितीवर चर्चा होणार आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आज मुंबईत परतण्याची शक्यता आहे.