सुदृढ, समृद्ध व तीक्ष्ण पत्रकारिता करण्याची गरज – पद्मश्री गिरीशजी प्रभुणे

0
245

– पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना पत्रकार महर्षी प्र. के. अत्रे पुरस्कार

*काळेवाडी, दि. २५ (पीसीबी): सुदृढ, समृद्ध व तीक्ष्ण पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन थोर समाज सेवक आणि पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांनी आज शनिवार (२५जून) काळेवाडी येथे पुरस्कार सोहळ्यात केले.

मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ पत्रकार विजय भोसले यांना “पत्रकार महर्षी प्र. के अत्रे पुरस्कार 2022” देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्ही.एस.आर.एस न्युज मीडिया ग्रुप चे मुख्य संपादक डॉ.लालबाबू गुप्ता, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष दादाराव आढाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गिरीश प्रभुणे म्हणाले पुढे म्हणाले की, सध्याच्या आधुनिक युगामध्ये पत्रकारितेची बिकट वाट सुरू आहे.पत्रकारांनी स्वतःचा तोल स्वतः च सावरावा लागतो कोणीही मदतीला येत नाही. मी स्वतः पत्रकारिता केली असून आठ पानाचे साप्ताहिक वर्तमान पत्र प्रकाशित करत होतो.
मी सडेतोड लेख लिहिल्यामुळे माझ्या घरावरही हल्ले खोरांनी हल्ले केले आहेत.पत्रकारांनी सत्यतेची कास सोडू नये.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. लालबापू गुप्ता आपल्या भाषण म्हणाले की “राजकारण, समाजकारण व प्रशासनामध्ये न्याय मिळत नसेल तर शेवटी पत्रकारांकडे धाव घेतात.हा जो पत्रकारांप्रति विश्वास आहे तो विश्वास पत्रकारांनी कायम ठेवला पाहिजे. नव्याने स्थापन झालेल्या संघटना व पदाधिकारी यांना व्ही. एस आर एस न्युज मीडिया ग्रुप नेहमीच बरोबर असेल.

कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती विजय भोसले सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, “नव्याने स्थापन झालेल्या पत्रकार संघाने माझा जो पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पत्रकार महर्षी प्र.के अत्रे पुरस्कार देऊन गौरव केला त्या बदल संघाचे मी आभार व्यक्त करतो. पिंपरी-चिंचवड शहर संघटना ही जरी नवीन असली तरी संघटनेत काम करणारे पदाधिकारी जुनेच आहेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे हे पत्रकारांसाठी गेली अनेक वर्षे काम करत आहेत बापूसाहेब गोरे यांनी कोरोनाच्या भीषण काळात पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या घरोघरी जाऊन अन्नधान्य किट वाटप केले हा त्यांचा उपक्रम महाराष्ट्रात कौतुकास्पद ठरला आहे.

यावेळी माजी नगरसेवक कैलास थोपटे, युवक कॉग्रेसचे शहरध्यक्ष नरेंद्र बनसोडे, आर पी आय चे अजीज शेख, काँग्रेसचे अशोक मोरे, बी.आर.माडगूळकर उपस्थितीत होते.
यावेळी अध्यक्ष – दादाराव आढाव,वरिष्ठ उपाध्यक्ष -संतलाल यादव,उपाध्यक्ष – महेश मंगवडे, संजय बोरा,सरचिटणीस – सुनील कांबळे,चिटणीस – श्रध्दा कोतावडेकर /कामथे,कोषाध्यक्ष- जितेंद्र गवळी, कार्यकारणी सदस्य – सायली कुलकर्णी,विनोद लोंढे, संतोष जराड,विश्वास शिंदे,सदानंद रानडे,कलिंदर शेख,अमोल डांबळे, मनीषा प्रधान,श्रद्धा प्रभुणे,प्रितम शहा,गणेश शिंदे,मुकुंद कदम,अतुल वैराट, मोहन दुबे, सुहास आढाव,या नूतन कार्यकारणीचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे,नरेश नातू,यशवंत नामदे,विकास चौधरी इत्यादी उपस्थित होते

कार्यक्रमाची प्रस्तावना बापूसाहेब गोरे यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिध्द निवेदक अक्षय मोरे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष दादाराव आढाव यांनी मानले.