बंडखोर शिंदे गटाला मोठा झटका..

0
411

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वापासून शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या वापरापर्यंत एकूण ५ महत्त्वाचे ठराव मंजूर केले आहेत. त्यामुळे बंडखोर शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे. या ठरावांमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्याच्या शिंदे गटाच्या प्रयत्नाला अडथळा होणार आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत झालेले ५ ठराव
१. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कार्यकारणीचा पूर्ण विश्वास आहे. पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत.
२. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षप्रमुखांना देत आहे.
३. बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही.
४. शिवसेना बाळासाहेब ठाकरे याची होती, आहे आणि कायम राहील.
५. शिवसेनेची मराठी अस्मितेशी व हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील.