मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजीनामा देणार नाहीत

PCB Admin
1 Min Read

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. अल्पमतात सरकार आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रीमंडळ बैठकीत राजीनामा देतील असा तर्क लावला जात होता. मात्र, ते राजीनाम्याचा निर्णय घेणार नसल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मिळाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी चर्चेनंतर राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी स्थगीत केला असून सर्व घडामोडींवर ते स्वतः लक्ष ठेवून आहेत.

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर महाविकास आघाडीतर्फे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत चर्चाच झाली नसल्याची माहिती आहे. नियमित विषयावर चर्चा करीत बैठक संपल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Share This Article