उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रश्नांवर देहू संस्थानचे अध्यक्ष भडकले

0
498

पिंपरी दि. १६ (पीसीबी) – देहू येथील जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या वैष्णव सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रोटोकाॅलनूसार भाषणाची संधी दिली नाही. त्यामुळे हा महाराष्ट्राचा अपमान झाला म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसने आंदोलने केली. त्यावर देहू संस्थानच्या विश्वस्त तथा अध्यक्ष नितीन मोरे यांनी प्रतिक्रिया देवून अजितदादांचे नाव देवूनही पीएमओ कार्यालयाने नाव वगळल्याचे सांगितले होते. मात्र, पिंपरीतील कार्यक्रमात देहू संस्थानच्या अध्यक्षांना तोच प्रश्न पत्रकारांनी विचारताच ते भडकले. त्यांनी पत्रकार परिषदेतून उठून निघाले. पण त्यांना पुन्हा समजावून बसविले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या प्रकारावर त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली.

पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे, संजय मोरे, प्रसाद शेट्टी यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी देहू संस्थानच्या संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला 21 किलो चांदीचे साहित्य दिले आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आमदार बनसोडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी नितीन महाराज मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यास संधी दिली नाही. यावरून विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते चांगलेच भडकले. ऐवढेच नाही तर पत्रकार परिषद सोडून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकार परिषदेत उपस्थित असणारे माजी आमदार विलास लांडे यांनी समजूत काढल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बसले.

आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून 22 लाखांचे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अभिषेकासाठी लागणारे सिंहासन, साहित्य देहु संस्थानला दि.18 भेट देणार आहेत. यामध्ये चांदीच सिंहासन, अभिषेख पात्र, मखर, पूजा आदी असणार आहे. शनिवारी पूजेच्या साहित्याची भव्य दिंडी काढण्यात येणार आहे. असेही आमदार बनसोडे यांनी सांगितले.

याप्रसंगी देहू संस्थानचे नितीन मोरे म्हणाले की, देहू संस्थानचा हा कार्यक्रम पुर्णपणे धार्मिक होता. याबाबत त्यावेळीच मी प्रतिक्रिया दिलेली आहे. परंतू, सदरील झालेल्या प्रकाराचं राजकारण होत असून देहू संस्थानबाबत गैरसमज पसरत आहेत. त्या घटनेवर झालेल्या प्रकाराबाबत आम्ही सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असं सांगितले. मात्र, पत्रकारांनी आणखी प्रश्नांचा भडीमार केल्याने पत्रकार परिषदेतून उठून जाण्याचा प्रकार केला.