नुपूर शर्माची जीभ कापणाऱ्याला एक कोटी..

bpcauthor bpcauthor
1 Min Read

गुरुग्राम, दि. ८ (पीसीबी) : भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे उठलेले वादंग अद्याप शांत झालेले नाही. आता या वादात भीम आर्मीनेही उडी घेतली आहे. नूपुर शर्मा यांची जीभ कापणाऱ्याला एक कोटीचे बक्षीस देण्याची घोषणा भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तंवर यांनी बुधवारी (ता. ८) केली. कानपूर हिंसाचाराची सूत्रधार नूपुर शर्मा असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे.

नूपुर शर्मा यांनी पैगंबराचा अपमान केला आहे. ज्यामुळे करोडो मुस्लिम समाज दुखावला गेला आहे. मोदी सरकार मुद्दाम नूपुर शर्माला अटक करीत नाही आहे. नूपुर शर्मा ही कानपूर दंगलीची खरी सूत्रधार आहे. योगी सरकारने त्यांना आरोपी का बनवले नाही, असा सवाल भीम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष नवाब सतपाल तन्वर यांनी केला.
नुकतेच एका टीव्ही चर्चेदरम्यान नूपुर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. चौफेर दबावानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. अनेक कट्टरवादी नूपुर शर्मा यांना धमक्याही देत ​​आहेत. वाढलेला धोका पाहता दिल्ली पोलिसांनी नूपुर शर्मा यांना सुरक्षा पुरवली आहे.

Share This Article