बारावीचा निकाल उद्या जाहिर होणार.

0
530

पुणे, दि. ७ (पीसीबी) – बारावीचा निकाल उद्या जाहिर करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज सांगितले. उद्या (८ जून) सकाळी निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परिक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी खालील वेबसाईटवर वर निकाल पाहू शकतील.
mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

बारावीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पहात असतात. कोरोनानंतर बारावीच्या झालेल्या परिक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहातायत. अखेर तारीख जाहीर झाली आहे.
कोविड पार्श्वभूमीवर बारावीची परिक्षा झाली होती. यंदाची परिक्षा ऑफलाईन घेण्यात आली होती. संभ्रमाची स्थितीही होती, पण विद्यार्थी-पालक -शिक्षकांनी बरचं सहकार्य केल्याने ही परिक्षा सुरळीत पार पडली. पेपर तपासणीचं कामही व्यवस्थितपणे पार पडल्याची माहीती राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी सकाळ डिजिटलला दिलीय. तसंच यंदा परिक्षेदरम्यानचा गोंधळ टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कोविड सुरक्षिततेचा विचार करुन शाळा तिथे केंद्र ही सुविधा लागू केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचही गोसावी यांनी सांगितलं.
कोरोना पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परिक्षांना सुरुवातीला विरोधही झाला होता. मात्र आता निकालाची तारिख जाहिर झाल्याने विद्यार्धी आणि पालकांची निकालाबाबतची उत्सुकता वाढलीय.