पर्यावरण दिनानिमित्त दिघीतील डोंगरावर वृक्षारोपण

0
426

दिघी, दि. ७ (पीसीबी) – गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दत्तगड दिघी येथील डोंगरावर वृक्षारोपण केले. अविरत श्रमदान या संस्थेसोबत हा उपक्रम घेण्यात आला.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, “वृक्षारोपण” हाच उत्तम पर्याय आहे. यासाठी प्रत्येकांनी एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे. येणाऱ्या भावी पिढीसाठी “प्रदूषण विरहित गाव, शहर, निर्माण करणे” हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे…! याच विचाराने प्रेरित होऊन “गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपने” जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून “दत्तगड दिघी येथील डोंगरावर वृक्षारोपण केले.

याप्रसंगी गरवारे निसर्ग प्रेमी ग्रुपचे सदस्य, शाम कुंभार संघटनेचे अध्यक्ष जयवंत खाटपे, जनरल सेक्रेटरी संजय शिंदे, संजय खोत, राजेंद्र आढाव, अविनाश चौधरी,माधव ढमाले, विलास पाटील, केशव रडे, रमेश दातीर, आण्णा पाटील, सतीश तारू, नारायण माने, महेश शेटे, मल्लापा बिरादार, अनिल घुगे, राजेंद्र दुनगव, वैजनाथ माळी भीमराव पाटील, उमेश पाटील, मनोज साळवी यांनी सहभाग घेतला. वरिष्ठ अधिकारी कामत साहेब, शिवराईकर साहेब, संजय पाटील, गणेश भोसले राहुल बारवकर, विलास आरेकर, निशांत जाधव यांनी सहकार्य केले.