फेसबुकवरील मैत्री ज्येष्ठाला पडली महागात

0
436

हिंजवडी, दि. ४ (पीसीबी) – फेसबुकवर मैत्री झालेल्या तरुणीने प्रॉडक्ट खरेदीचे आमिष दाखवून ज्येष्ठाची तीन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 4 ते 13 मे 2022 दरम्याम मारुंजी, मुळशी येथे घडला.

याप्रकरणी रामजीत सिंह (वय 61, मारुंजी, मुळशी ) यांनी फिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सोनिया विल्यम आणि अजयकुमार (पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सिंह यांची फेसबुकवर सोनिया विल्यम या महिलेशी मैत्री झाली. आरोपी महिलेने वारंवार सिंह यांच्याशी चॅटिंग करुन जवळीक निर्माण केली. त्यांचा विश्वास संपादन केला. काबोनियॉ एच 50 या नावाचे फार्मास्युटीकल प्रॉडक्ट खरेदी-विक्री करुन चांगले पैसे मिळतात असे आमिष दाखविले. त्यानंतर अजयकुमार नावाच्या इसमाचे फेक ईमेल आयडी पाठवून संपर्क करण्यास सांगितले. ऑर्डरसाठी तीन लाख रुपये खात्यावर पाठविण्यास भाग पाडले. महिलेने प्रॉडक्ट, पैसे परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.