एलआयसी किंग राजेंद्र बंब याच्याकडे तिसऱ्या दिवशीही मोठे घबाड

0
358

धुळे, दि. ४ (पीसीबी) – धुळ्यातील अवैध सावकार राजेंद्र बंब कारवाई प्रकरणी आजदेखील मोठी बातमी समोर आली आहे. राजेंद्र बंब याच्याकडे तिसऱ्या दिवशीही मोठे घबाड सापडले आहे. गुन्हे शाखेच्या तिसऱ्यांदा दिवसाच्या तपासणीत तब्बल 5 कोटी 13 लाख 44 हजार 530 रुपयांची रोकड सापडली आहे. तर 5 कोटी 54 लाख रकमेचे सुमारे 10 किलो 563 ग्राम सोने आढळले आहे. तसेच 7 किलो 621 ग्रॅम चांदीही जप्त करण्यात आली. तपास यंत्रणेने आज एकूण 10 कोटी 73 लाख रुपये रोकड आणि सोने जप्त केले आहे. तपास यंत्रणा गेल्या तीन दिवसांपासून बंबची संपत्ती मोजत आहे. आतापर्यंत तब्बल 14 कोटींहून अधिक किंमतीचे सोने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

एलआयसी किंग अशी ओळख असलेला धुळ्यातील विमा एजंट राजेंद्र बंब याच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत कोट्यवधींचं घबाड हाती लागलं होतं. त्यानंतर राजेंद्र बंब हा अवैध सावकारी करत असल्याचं उघड झालं. याच प्रकरणात राजेंद्र बंब याच्या बँक लॉकरची पोलिसांनी तपासणी केली असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.