Maharashtra

9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी शासनाकडून मोफत लसीकरण

By PCB Author

March 21, 2023

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – महिलांमध्ये कॅन्सरची समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. यावर उपाय म्हणून महिला व बालकल्याणच्या वतीने महिलांना लसीकरण कमी भावात उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार उमा खापरे यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारला केली आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तत्काळ त्याबाबतची घोषणा केली.

आपल्या निवेदनात उमा खापरे म्हणाल्या, लसीकरण ९ ते १४ वयोगटात होणे अत्यंत गरजेचे आहे. या आजाराची जनजागृती करणे महत्वाचे आहे. मी स्वतः त्यासाठी विधानपरिषद सभागृहात ही मागणी करत आहे. मंत्री सावंत यांनी त्यावर उत्तर देताना स्पष्ट केले की, ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी शासनाने मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच शाळेत कॅन्सरचे जनजागृती करण्यात येणार आहे. किती मुलींना लस देण्यात आली यात आता शासन स्वतः लक्ष देणार आहे