600 रुपयासाठी मारहाण करणाऱ्या भाईला अटक

0
152

दुकानातून 600 रुपयांचे समान घेत दमदाटी करणाऱ्या भाई ला पोलिसांनी अटक केली आहे.ही घटना र कोविवारी (दि.2) मरकळ येथे घडली आहे.

गणेश कुंडलिक लोखंडे याला अटक केली आहे.तर त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी देवीप्रसाद जोखोराम गुप्ता (वय 27 रा.मरकळ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी यांच्या दुकानातून वेफर्स कुरकुरे व कोल्ड्रिंक असे सहाशे रुपयांच्या सामान घेतले मात्र त्याचे पैसे न देता आरोपीतून निघून जात होता. यावेळी फिर्यादी यांनी त्याला पैशासाठी हटकले तेंव्हा आरोपीने तु मला ओळखत नाही का मी मरकळचा भाई आहे म्हणत त्याने लाथा बुक्क्यांनी व दगडाने फिर्यादीला मारहाण केली व दुकानातून निघून गेला. यावरून आनंदी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.