चिंचवड मतदारसंघासाठी 510 तर कसबा पेठ मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्रे

0
330

चिंचवड, दि.४ (पीसीबी) – 205 चिंचवड आणि 215 कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम सुरू असून त्यानुसार मंगळवार पर्यंत नामनिर्देशपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दरम्यान या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.चिंचवड मतदारसंघासाठी 510 तर कसबा पेठ मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्रे असणार आहेत.

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2022 पासून राबवण्यात आला. यानुसार 5 जानेवारी 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार 205 चिंचवड विधानसभा मतदार संघात 3 लाख 1 हजार 648 पुरुष, 2 लाख 64 हजार 732 स्त्री आणि 35 तृतीयपंथी याप्रमाणे एकूण 5 लाख 66 हजार 415 मतदार संख्या आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत 48 हजार 106 ची वाढ झाली आहे.

215 कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 1 लाख 36 हजार 873 पुरुष, 1 लाख 38 हजार 550 स्त्री आणि 5 तृतीयपंथी याप्रमाणे 2 लाख 75 हजार 428 याप्रमाणे मतदार संख्या आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदार संख्येत 15 हजार 255 ची घट झाली आहे.

अंतिम मतदार यादीतील मतदारसंख्येच्या आधारे 215- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्रे तर 205- चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी 510 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली.
..