चिंचवडच्या पोटनिवडणुकीत 28 उमेदवार रिंगणात

0
309

चिंचवड, दि. ११ (पीसीबी): – चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात 28 उमेदवार आहेत. अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत 5 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 128 जणांनी 231 अर्ज नेले होते. त्यापैकी 40 जणांनी 53 अर्ज भरले होते. अर्जाच्या छाननीमध्ये 53 अर्जांपैकी 40 अर्ज पात्र तर सात उमेदवारांचे 13 अर्ज अपात्र ठरले. त्यानंतर या निवडणूक रिंगणात 33 उमेदवार शिल्लक राहिले. शुक्रवारी 33 पैकी 5 उमेदवारांनी माघार घेतल्याने 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम, रविंद्र पारधे, राजेंद्र काटे, भाऊ अडागळे, मनिषा कारंडे यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.

दरम्यान, भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे, बहुजन भारत पार्टीचे तुषार लोंढे, महाराष्ट्र लोकहितवादी पार्टीचे प्रफुल्ला मोतिलिंग, आजाद समाज पार्टीचे मनोज खंडागळे, बहुजन मुक्ती पार्टीचे सतिश कांबिये, बहुजन भिम सेनेचे मोहन म्हस्के, अनिल सोनावणे, मिलिंद कांबळे, अजय लोंढे, रफिक कुरेशी, बालाजी जगताप, गोपाळ तंतरपाळे, अमोल सुर्यवंशी, सिद्धीक शेख, किशोर काशीकर, डॉ. मिलिंदराजे भोसले, सोयलशहा शेख, हरिश मोरे, जावेद शेख, श्रीधर साळवे, राजू काळे, दादाराव कांबळे, चंद्रकांत मोटे, सुधीर जगताप, सतिश सोनावणे, सुभाष बोधे अशा 28 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.