हॉटेल रेटिंग टास्कच्या आमिषाने पावणेतीन लाखांची फसवणूक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

फाइव्‍ह स्टार हॉटेल्सना रेटिंग देण्याच्या ऑनलाइन टास्कमधून एका महिलेची दोन लाख ८७ हजार ६८१ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना २० मे रोजी थरमॅक्स कंपनी, आकुर्डी येथे घडली.

याबाबत पिडित महिलेने शनिवारी (२० जून) पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. फाइव्‍ह स्टार हॉटेल्सना रेटिंग देण्याच्या टास्कमध्ये सहभाग घेतल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देतो असे आमिष त्याने दाखवले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला वेगवेगळ्या युपीआय आयडीवर रक्कम पाठविण्यास सांगून एकूण दोन लाख ८७ हजार ६८१ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article