अफिम आणि गांजा विक्री प्रकरणी चौघांना अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दि.१७(पीसीबी)-निगडी आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये अफिम आणि गांजा विक्री प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. निगडी पोलिसांनी ओटास्किम येथून एकाला गांजा बाळगल्या प्रकरणी अटक केली. तर अमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यातील सावरदरी येथे अफिम विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक केली.

सनी शंकर थोरात (२०, निगडी) असे निगडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सनी याने त्याच्याकडे बेकायदेशीरपणे दोन हजार रुपये किमतीचा ४० ग्रॅम गांजा बाळगला. याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून पोलिसांनी गांजा जप्त केला आहे. भवरलाल सोनाराम जाट (३४, चाकण), महेंद्रसिंग चिमणाराम (२५, सावरदरी, खेड), मोहन धनराम जाट (२२, सावरदरी, खेड) या तिघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपी सावरदरी गावात अफिम विक्रीसाठी दुचाकीवरून आले. त्यांच्याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या मोहन आणि भवरलाल या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे ३९६ ग्रॅम अफिम, एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त केले. त्यांनी हा अफिम आरोपी महेंद्रसिंग याच्याकडून आणला असल्याचे सांगितले.

Share This Article