रात्री 8 वाजता मोठा हल्ला

1 Min Read

दि.०७(पीसीबी)-डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुज खाडी खुली करण्याकरिता 48 तासाचा वेळ दिला. मंगळवारी रात्री 8 वाजता वेळ संपत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले की, जर इराणकडून होर्मुज खाडी खुली केली नाही तर आम्ही रात्री 8 वाजता मोठा हल्ला करू. काही तासात इराणला संपून टाकू. रातोरात संपूर्ण देश उद्ध्वस्त होऊ शकतो. इराण युद्धात माघार घेताना दिसत नाहीये. पण अमेरिका तयारीला लागल्याचे बघायला मिळत आहे.

जगाची झोप उडवणारा फोटो पुढे आला. इराण झुकत नाहीये. अमेरिकेने इराणवरील हल्ल्याची तयारी पूर्ण केली. इराण आणि अमेरिका युद्धात मध्यस्थी करण्याकरिता अनेक देश पुढे आली. पण करार काही होत नाही. व्हाईट हाऊसच्या प्रेसमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, पूर्ण इराणला आम्ही एक रात्री उडवून देऊ.

ही रात्र दुसरी तिसरी कोणतीही नसून मंगळवारची उद्याची रात्र होऊ शकते. होर्मुज खाडी खुली केली नाही तर तर ऊर्जा प्रकल्प, पायाभूत सुविधा सगळीकडे म्हणजे सगळीकडे हल्ला होऊ शकतो. इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने विनाशकारी B-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने जगात हाहाकार उडाला.

Share This Article