धक्कादायक! एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत! आवडत्या पोस्ट साठी खरात बाबांच्या संपर्कात राहिल्याने खळबळ

1 Min Read

दि.०७(पीसीबी)-नाशिकमध्ये सध्या गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतलं आहे. एका आयएएस अधिकाऱ्यानंतर आता दोन महिला वरिष्ठ पोलीस अधिकारीही या प्रकरणात अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, डीसीपी आणि एसीपी दर्जाच्या दोन महिला अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या. आवडत्या पोस्टिंगसाठी त्यांनी खरातकडे धाव घेतली होती का? तसेच या संबंधात आर्थिक व्यवहार झाले होते का? याचा तपास आता होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अशोक खरातने महिलांचं लैंगिक शोषण केल्याची कबुली दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चमत्कार आणि वशीकरणाच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून, हातचलाखीच्या माध्यमातून त्यांना धमकावलं आणि शोषण केलं, असंही त्याने मान्य केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी एसआयटीने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. आज अशोक खरातच्या मुलगा आणि मुलीचीही चौकशी होणार असून, पत्नी मात्र अद्याप फरार आहे.

दरम्यान, एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार असून, या संपूर्ण प्रकरणावर महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share This Article