खामेनेईच्या मृत्यूनंतर इराणचा प्रतिहल्ला; तेल अवीव-जेरुसलेमवर क्षेपणास्त्र वर्षाव

1 Min Read

दि.०२(पीसीबी)-मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला असून इराणने अमेरिके-इस्त्रायलविरोधात जोरदार प्रतिहल्ला सुरू केला आहे. अमेरिकन आणि इस्त्रायली सैन्याने तेहरानसह इराणमधील महत्त्वाच्या शहरांवर हवाई कारवाया केल्यानंतर आणि सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इराणने मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ले चढवले. या हल्ल्यांमध्ये जेरुसलेमवर डागलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांमुळे किमान सहा जण जखमी झाले, तर इस्त्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

इराणच्या क्षेपणास्त्र शक्तीने सलग काही दिवस इस्त्रायलला लक्ष्य केले असून हवाई संरक्षण यंत्रणांवरही मोठा दबाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त लष्करी कारवाई करत इराणमधील बॅलेस्टिक मिसाइल तळ, लष्करी सुविधा आणि युद्धनौकांवर बॉम्बहल्ले केले. या मोहिमेमुळे इराणच्या लष्करी क्षमतेला मोठा फटका बसल्याचा दावा केला जात आहे.

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती अधिकच चिघळली असून दोन्ही बाजूंनी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत. या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जागतिक समुदायाने तातडीने तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर असून युद्ध आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगाचे लक्ष आता या संघर्षाकडे लागले असून पुढील काही दिवस निर्णायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 

I

Share This Article