पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण वाहतूककोंडी

PCB Admin
1 Min Read

दि.१९ (पीसीबी)- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. खंडाळा घाटाच्या आधीपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे आयोजित कार्यक्रमासाठी राज्यभरातून हजारो शिवभक्त रवाना झाल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर ताण वाढला आहे. परिणामी प्रवाशांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागत आहे.

वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून शक्य असल्यास प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत.

Share This Article