जुनी सांगवीत नवीन आधार केंद्राचे उदघाट्न

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि . ११ ( पीसीबी ) :
सांगवी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आधार केंद्र सांगवी गावठाण येथील तलाठी कार्यालयात सुरू झाले असून, या केंद्राच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना आधार कार्डसंबंधित नोंदणी, माहिती सुधारणा, तसेच बायोमेट्रिक सेवा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सांगवी विकास मंचच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना डिजिटल ओळखीच्या सेवांमध्ये सुलभता येणार आहे.
यावेळी माजी महापौर माई ढोरे, जवाहर ढोरे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, शिवराज शितोळे, ह.भ.प. बब्रुवान महाराज वाघ, सांगवी विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश भागवत, प्रमोद ठाकर, दिलीप तनपुरे, उज्ज्वला ढोरे, गणेश ढोरे, धम्मरत्न गायकवाड, विश्वनाथ शिंदे, चेतन शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओंकार भागवत यांनी सांगितले की, हे आधार कार्ड केंद्र नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सांगवी परिसरात आतापर्यंत एकही आधार केंद्र कार्यरत नसल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर महा ई-सेवा केंद्राला नवीन आधार केंद्र मंजूर झाल्याने नागरिकांना आता सर्व आधारसंबंधित सेवा सांगवीतच उपलब्ध होणार आहेत. या केंद्राद्वारे लोकांना त्यांच्या आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाइल नंबर, जन्मतारीख यांसारख्या माहितीचे अपडेट करण्यासाठी सोपी व जलद सेवा उपलब्ध होईल.
कार्यक्रमाचे आयोजन सांगवी विकास मंचचे कार्याध्यक्ष ओंकार भागवत यांनी केले. सूत्रसंचालन नारायण भागवत यांनी केले.

Share This Article