बोपदेव घाटातील गँगरेप प्रकरणी मोठी अपडेट

2 Min Read

पुणे, दि. ५ : बोपदेव घाटामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत असलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत मित्राला ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आला. यासोबतच बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी या दोघांकडे असलेल्या मौल्यवान वस्तू काढून घेतल्या. दरम्यान, सासडवडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एका बाईकवर जाणारे तिघे रस्त्त्यात थांबल्याचे सीसी फूटेज पोलिसांना मिळाले असून त्या दिशेने तपास सुरू आहे. पोलिसांची २५ पथके विविध मार्गावर आहेत.

आरोपींनी हे दोघे बोपदेव घाटातील टेबल पॉईंटवर फिरत असताना त्यांना एकटे गाठले. त्यांना धमकावत आडबाजूला नेले. आरोपींनी त्यांच्या मौल्यवान वस्तू काढून घेतल्या. त्यानंतर मित्राला मारहाण केली. त्याचा शर्ट काढून त्याचे हात बांधले. पॅन्टचा बेल्ट काढून त्याचे पाय बांधले आणि त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या सोबतच या तीन आरोपींकडे कोयता, लाकडी बांबू आणि धारदार चाकू होता. मित्राला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला.

आरोपी निघून गेल्यावर पीडित मुलीने कसेबसे स्वतःला सावरत मित्राचे हातपाय सोडवले. तेथून हे दोघे वारजे येथील तिच्या खोलीवर गेले. पीडित मुलीने बहिणीला घडलेला सर्व प्रसंग कथन केला. त्यानंतर, हे सर्वजण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे प्राथमिक उपचार घेऊन मुलीला ससून रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपींच्या वर्णनावरून त्यांचे रेखाचित्र तयार केले असून त्या आधारे तपास सुरू केला आहे. आरोपींचा माग काढला जात असून रेखा चित्रातील वर्णनाप्रमाणे दिसणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Share This Article