अब्दुल सत्तारचे करायचे काय. खाली डोक वर पाय

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि. ०३ (पीसीबी) – राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांनी अब्दुल सत्तारचे करायचे काय. खाली डोक वर पाय, पन्नास खोके एकदम ओक्केच्या घोषणांनी गुरुवारी (दि. ३) निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह दणाणून सोडले.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने संवाद साधण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची गुरुवारी (दि. ३) निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सहकार व पणन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रविणकुमार नहाटा, पुणे कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, सचिव, राज्य बाजार समिती संघाचे सदस्य उपस्थित होते.

पणन मंत्री अब्दुल सत्तार नियोजीत कार्यक्रमाला दीड तास उशिरा पोहचले. तेथे आल्यानंतर केवळ एकच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. प्रतिनिधी बोलत असताना त्यांनी तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. वाद निर्माण होईल असे वक्तव्य करु नका. मला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला.

Share This Article