रेल्वे तिकिटामध्ये जेवणाची सोय करून देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

bpcauthor
1 Min Read

चिंचवड, दि. ०२ (पीसीबी) : रेल्वेचे तिकीट बुक करताना त्या तिकिटामध्ये जेवणाची सोय करून देतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची दोन लाख 94 हजार 600 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 मे रोजी लक्ष्मीनगर, लिंकरोड, चिंचवड येथे घडली.

देवेंद्र लक्ष्‍मण मोकाशी (वय 56, रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9434435539 क्रमांक धारक आणि युको बँक खाते 32800110030080 धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचे रेल्वे तिकीट बुक केले. त्या तिकिटामध्ये जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याचा आरोपीने बहाणा केला. त्यातून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांचा मोबाईल फोन ॲप द्वारे हॅक केला. त्या आधारे फिर्यादी यांची दोन लाख 94 हजार 600 रुपयांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article