गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

वाकड, दि. 19 (प्रतिनिधी)

गांजा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 17) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ताथवडे येथे करण्यात आली.

करण युवराज बागुल (वय 22, रा. शिरपूर, जि. धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मोहम्मद गौस रफिकभाई नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथील एका कंपनीसमोर एक तरुण गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून करण बागुल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 19 हजार 500 रुपये किमतीचा 396 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article