शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

1 Min Read

दि ७ जुलै (पीसीबी ) वाकड,
शस्त्र बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 5) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास जली मल्हार कॉलनी, थेरगाव येथे करण्यात आली.

रविकिरण साहेब चंदनशिवे (वय 33, रा. जय मल्हार कॉलनी, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रमोद कदम यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय मल्हार कॉलनी येथे एकजण शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविकिरण याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 200 रुपये किमतीचा एक कोयता आढळून आला. पोलिसांनी हे शस्त्र जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article