आमदार सुनील टिंगरे यांच्यावर निलंबनाची करवाई करून गुन्हा दाखल करा – आपचे रविराज काळे यांची मागणी

bpcauthor
1 Min Read

पुणे शहारात गाजत असेलेले हिट अँड रन प्रकरण ज्या अपघातमध्ये २ तरुणाना आपला जीव गमवावा लागला. ज्या व्यक्ती मुळे हा भीषण अपघात झाला त्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीस वाचण्यासाठी येरवडा पोलिस स्टेशन येथिल प्रशासनावर दबाव टाकून लवकर जामीन होण्यासाठी FIR त्या पद्धतीने करून त्या व्यक्तीचा लवकरात लवकर जामीन कसा होईल या साठी पोलीसाना भाग पाडणारे आणि रक्ताचे सँपल बदलून घेण्यासाठी ससून मधील डॉक्टरांना संपर्क केल्याचे पोलिस तपासात निष्पण होत आहे .आणि ससुन रूग्णालयात अधिक्षक करावे म्हणून शिफारस सुद्धा टिंगरे यांनी हसन मुश्रीफ यांचेकडे केली होती.

आर्थिक हित सबंध जोपासून हा सर्व प्रकार या लोकप्रतिनिधी कडून केला जात होता का ? याची चौकशी करण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकरणाची जो पर्यंत चौकशी होत नाही तो पर्यंत अनिश्चित काळासाठी या आमदारांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा.आपण केलेल्या कारवाई संदर्भात लेखी उत्तराद्वारे कळवावे.अशी मागणी आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी केली आहे.

Share This Article