तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

bpcauthor
1 Min Read

पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि. 22) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास देहू-मोशी रोडवर कुदळवाडी चौकात चिखली येथे करण्यात आली.

सागर राहुल राठोड (वय 20, रा. मोशी. मूळ रा. कुरकुंडी, ता. खेड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार धनाजी शिंदे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सागर राठोड याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. त्याने स्वतःकडे एक कोयता हे शस्त्र बाळगले. याबाबत गुन्हे शाखा युनिट चारला माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई कारवाई सागर राठोड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाईल फोन, दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article