तडीपारीनंतर एकाच महिन्यात शस्त्रासह सापडला सराईत गुंड

1 Min Read

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्द्दीतील एका गुंडाला मागील महिन्यात तडीपार केले होते. त्यानंतर या महिन्यात त्याला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. तो कोणतीही परवानगी न घेता शहरात आला, तसेच त्याने बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 21) सायंकाळी पाच वाजता कस्पटे वस्ती, वाकड येथे करण्यात आली.

राजेंद्र उर्फ राजा काशिनाथ वाडघरे (वय 35, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विक्रांत चव्हाण यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 2 एप्रिल 2024 रोजी 12 महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपला नसताना देखील त्याने कोणतीही परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. तसेच स्वतःकडे एक पिस्तुल बेकायदेशीरपणे बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article