मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता

PCB Admin
0 Min Read

शिरूर : महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच शिरूर मतदार संघातील पीडिसीसी बँक आणि प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या सर्व शाखांबाहेर पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणीदेखील अमोल कोल्हे यांनी या पत्रामध्ये केली आहे.

Share This Article