दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

PCB Admin
1 Min Read

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्रावाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बँगलोर-मुंबई महामार्गावर बाणेर येथे सोमवारी (दि.15) झाला आहे,

लक्ष्मीकांत बेचन विश्वकर्मा (वय 54 रा.शेरगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे, याप्रकरणी पोलीस नाईक अविनाश सगर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीघेवून भरधाव वेगाने जात असताना त्यांचे गाडी वरील नियंत्रण सुटले व गाडी घसरली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे, यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे,

Share This Article