अजितदादांना सर्वात मोठा धक्का

bpcauthor bpcauthor
1 Min Read
  • राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि घड्याळ चिन्ह जाणार

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतल्याने अजितदादा पवार यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालायात धाव घेतली. या प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत आज सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला तुम्ही दुसरे चिन्ह का निवडत नाही जेणेकरुन तुम्ही तुमच्या पक्षाचे कामकाज शांततेने आणि तणावाशिवाय करू शकता? निवडणुकीदरम्यान तुम्ही ते चिन्ह वापरणे सुरू ठेवू शकता अशी विचारणा केली.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. अजित पवार आमच्या लोकप्रियतेचा वापर करत आहेत असा दावा शरद पवार गटाने केला. फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावरही आक्षेप घेण्यात आला. यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांचं नाव वापरू नका असे निर्देश दिले. तसेच याच सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला विचारले की तुम्ही दुसरे चिन्हा का घेऊ शकत नाहीत.

Share This Article