घरासमोर पार्क केलेली रिक्षा चोरीला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

ताथवडे, दि. ०८ (पीसीबी) – घरासमोर पार्क केलेली रिक्षा अज्ञाताने चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी जेएसपीएम कॉलेज शेजारी, ताथवडे येथे उघडकीस आली.

अजय अर्जुन अडसूळ (वय 26, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 90 हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच 14/एचएम 1511) बुधवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली. घरासमोरील मोकळ्या जागेतून अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची रिक्षा चोरून नेली. गुरुवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article