दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पुणे, दि. २७ (पीसीबी) – दोन दुचाकीच्या अपघातात 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात निघोजे येथे महाळुंगे-तळवडे मार्गावर रविवारी (दि.25) दुपारी चार वाजता घडला.

गजानन पांडुरंग जाधव (वय 37 रा.मोरेवस्ती, चिखली) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. . संजय एकनाथ इंगळे (वय 52 रा.मोई) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अजय दादाभाऊ केदारी (वय 20 रा. महाळुंगे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या साडूचा मुलगा गजानन जाधव हे दुचाकीवरून महाळुंगे वरून मोरेवस्ती येथे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले असता अजय हा देखील दुचाकीवरून जोरात आला. यावेळी त्याने बेदरकारपणे गाडी चालवून गजानन यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यात गजानन हे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपासणी करत आहेत.

Share This Article