गाडी काढण्यास सांगितले म्हणून तरुणाला बेदम मारहाण

bpcauthor bpcauthor
1 Min Read

हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) -पार केलेली गाडी काढत असताना आडवी असलेली कार काढण्यास सांगितले म्हणून एकाने तरुणाला बेदम मारहाण केली आहे हे घटना रविवारी मान फेस थ्री येथे घडली

याप्रकरणी दीपक राजकुमार पवार (वय 31 रा हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी मारुती सुझुकी बलेनो एम एच 14 जी.आर. 11 77 या गाडीवरील चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पिण्यासाठी थांबले होते यावेळी त्यांनी त्यांचे कार्य तेथेच पार केली होती चहा पिऊन झाल्यानंतर ते माघारी येत असताना त्यांच्या कारला आडवी आरोपीने त्याची गाडी लावली होती. यावेळी फिर्यादी यांनी त्यांना गाडी काढण्यास सांगितले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादींच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Share This Article